
सहा विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
मुंबई, ता. २१ : रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने सहा विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०४७१४ वांद्रे टर्मिनस-बिकानेर साप्ताहिक विशेष पूर्वी ३१ मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती आता ३० जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे; तर ट्रेन क्र. ०४७१३ बिकानेर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष ३० मार्चऐवजी २९ जूनपर्यंत; ट्रेन क्र. ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर साप्ताहिक विशेष २६ जूनपर्यंत, ट्रेन क्र. ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष २५ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे. ट्रेन क्र.०९७२४ वांद्रे टर्मिनस-जयपूर साप्ताहिक स्पेशल ३० मार्चऐवजी २९ जूनपर्यंत; तर ट्रेन क्र. ०९७२३ जयपूर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष २८ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे.
मुदत वाढवण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या पीआरएस केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.