पद्मयोग महाविद्यालयात दीक्षांत सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मयोग महाविद्यालयात दीक्षांत सोहळा
पद्मयोग महाविद्यालयात दीक्षांत सोहळा

पद्मयोग महाविद्यालयात दीक्षांत सोहळा

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या पद्मयोग साधना महाविद्यालयाचा पदव्युत्तर दीक्षांत सोहळा नुकताच पार पाडला. यासह वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षणतज्ज्ञ डॉ. विकास गोखले हे होते; तर प्रमुख अतिथी म्हणून तेरणा ट्रस्टचे सीईओ पी. टी. देशमुख उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ योग शिक्षक आणि योगोपचारक देवांग शहा, बृहन्मुंबई महापालिकेच्या उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मराठमोळ्या वातावरणात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारून करण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायनानंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी अतिथींचा थोडक्यात परिचय करून देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच, विठ्ठल - रखुमाईची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यापाठोपाठ पद्मयोग साधना कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी गीतगायन, नृत्य एकपात्री प्रयोग, आसनांचे सादरीकरण असे अनेकविध कार्यक्रम सादर केले. यानंतर अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने पदवीदान समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन पद्मयोग साधना कॉलेजच्या प्राचार्या सुषमा काळे यांनी अनिता अल्वा दत्तात्रय चौधरी आधी सहकाऱ्यांच्या सहकार्याने केले.