
टिळक नगर मुंबई पब्लिक स्कुलमध्ये स्नेहसंमेलन
चेंबूर, ता. २२ (बतमीदार) ः चेंबूर येथील टिळकनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्नेहसंमेलनात मुलांनी आपल्या देशाची, राज्याची संस्कृती व परंपरा जपणारे अनेक नृत्यप्रकार सादर केले. तसेच या वेळी नाट्यछटा व विविध स्पर्धा, प्रकल्प व प्रदर्शन भरवण्यात आले होते. विविध स्पर्धेत मुलांनी उत्तुंग कामगिरी करून यश मिळवले. या मुलांना प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थी आणि पालक यांनी अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा पांचाळ यांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शाळेचे मुख्याध्यापक रुकमाजी पांढरे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाकरिता खूप मेहनत घेतली.