Wed, May 31, 2023

ॲड. दिनेश्वर पाटील यांची निवड
ॲड. दिनेश्वर पाटील यांची निवड
Published on : 23 March 2023, 11:09 am
वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : भिंवडी वकील संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. दिनेश्वर पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. संघटनेची २०२३ ते २०२५ या दोन वर्षांकरिता निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. दिनेश्वर पाटील, उपाध्यक्ष ॲड. गणेश काबूकर, सेक्रेटरी ॲड. सुयोग म्हात्रे, सहसेक्रेटरी दीपेश भोईर, खजिनदार ॲड. सुधीर भोईर, कार्यकारणी सदस्य ॲड. कल्पेश पाटील, ॲड. अंकित कडू, ॲड. सूर्यशेखर चिटीमल्ये, ॲड. अझरा मोमीन, ॲड. रमाकांत पाटील विजयी झाले आहेत. ॲड. नगमा अंसारी, ॲड. सिद्धी पाटील यांची महिला सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.