Fri, June 9, 2023

किन्हवलीच्या तीन विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत
किन्हवलीच्या तीन विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत
Published on : 23 March 2023, 11:15 am
किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे शहापूर येथे झालेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या व्ही. पी. एम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत. सहावीच्या समृद्धी विशे, देवयानी देसले, लावण्या भांगरथ या तीन विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे. मुख्याध्यापिका विद्या सातपुते, शिक्षक प्रवीण केदार, कैलास डोंगरे, वैष्णवी देसले, विद्या देसले, दीपाली पष्टे, संजना गगे, मयुरी फर्डे, स्वाती रोकडे आदींनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.