आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव
आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव

आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : कल्याण-डोंबिवली शहरात पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. पाण्यासाठी दररोज नागरिक मोर्चे काढत आहेत. नवी मुंबईतील मोरबे धरणातील १४० दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर झाला होता; मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. २७ गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहेत. १०५ एमएलडी पाणी कोटा येथे देण्यात येणार होता; मात्र प्रत्यक्षात ६५ एमएलडी पाणी देण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणासाठी हा पाणी कोटा पुरेसा नाही, असे म्हणत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात केडीएमसीमधील पाणीटंचाईचे वास्तव मांडले. तसेच मंजूर पाणी कोटा देता येत नसेल, तर येथे नव्याने होत असलेल्या बांधकामांच्या परवानग्या थांबवणार का, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. यावर पूर्ण कोटा कसा देता येईल, याविषयी सूचना एमआयडीसीला केल्या असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.