Fri, June 2, 2023

नेहरू आर्ट गॅलरीत कलाशिक्षकांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन
नेहरू आर्ट गॅलरीत कलाशिक्षकांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन
Published on : 23 March 2023, 11:37 am
वडाळा (बातमीदार) : बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत संगीत व कला अकादमी-कला विभागातर्फे कलाशिक्षकांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन ‘आर्टिस्ट कॅम्प’ हे वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २१) प्रदर्शनाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी ममता राव यांच्या हस्ते करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन २७ मार्चपर्यंत ११ ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनात भोर (जि. पुणे) येथे ७ ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कला प्राचार्य दिनकर पवार यांच्या नियोजनाने आयोजित केलेल्या निसर्गचित्र कार्यशाळेतील निसर्गचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.