भिवंडी पालिकेत शहीदांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिकेत शहीदांना अभिवादन
भिवंडी पालिकेत शहीदांना अभिवादन

भिवंडी पालिकेत शहीदांना अभिवादन

sakal_logo
By

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अग्रस्थानी असलेले वीर शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची नावे देशातील अमर शहिदांमध्ये आदरपूर्वक व मानाने घेतली जातात. गुरुवारी (ता.२३) शहीद दिनानिमित्त या शहिदांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या तळमजल्यावर उपायुक्त (कर) दीपक झिंजाड यांच्या हस्ते तिन्ही शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लेखा व वित्त अधिकारी किरण तायडे, प्रणाली घोंगे, सहायक आयुक्त प्रीती गाडे, संदीप सोमाणी, सहायक आयुक्त बाळाराम जाधव, नितीन पाटील, विद्युत अभियंता सुनील पाटील, प्रभाग अधिकारी राजू वरळीकर, सुधीर गुरव आणि महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.