गोखले उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखले उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण
गोखले उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण

गोखले उड्डाणपुलाचे तोडकाम पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पश्चिम रेल्वेने अंधेरी रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाण पुलाचे गर्डर काढण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. रेल्वेची सर्व यंत्रसामग्री हलवण्यात आली आहे. नवीन पूल बांधण्यासाठी शनिवारी (ता. २५) मुंबई महापालिकेच्या ताब्यात रेल्वेची जागा देण्यात आली आहे. आता पालिका नवीन पुलांची पुनर्बांधणी करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले; मात्र रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पालिकेद्वारे त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. गोखले पुलाच्या रेल्वेच्या भागाचे केवळ पाडण्याचे काम पश्चिम रेल्वेकडे सोपवण्यात आले. रेल्वेच्या भागाचे काम पश्चिम रेल्वेने ट्रॅफिक ब्लॉक करून युद्धपातळीवर पूर्ण केले.
...
वेळेपूर्वी काम पूर्ण
सर्व १६ स्टील गर्डरचे डी-लाँचिंग आणि पुलाच्या पूर्वेकडील दोन स्पॅन तोडण्याचे काम पश्चिम रेल्वेने पूर्ण केले आहे. रेल्वेच्या भागासह नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी संपूर्ण जागा पालिकेकडे ३१ मार्च २०२३ रोजी देण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु रेल्वेने जलदगतीने काम पूर्ण करून २५ मार्चलाच नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी संपूर्ण जागा उपलब्ध करून दिली.