राष्ट्रीय रत्न पुरस्काराने भाग्यश्री तोंडलीकर-दलाल सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय रत्न पुरस्काराने भाग्यश्री तोंडलीकर-दलाल सन्मानित
राष्ट्रीय रत्न पुरस्काराने भाग्यश्री तोंडलीकर-दलाल सन्मानित

राष्ट्रीय रत्न पुरस्काराने भाग्यश्री तोंडलीकर-दलाल सन्मानित

sakal_logo
By

सरळगाव, ता. २७ (बातमीदार) : मुरबाडसारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या भाग्यश्री तोंडलीकर, दलाल यांना दिल्ली येथे राष्ट्रीय रत्न या अत्यंत प्रतिष्ठेच्‍या पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले. केंद्रीय पंचायतीराज मंत्री कपिल पाटील यांनी त्‍यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भाग्यश्री तोंडलीकर, दलाल हिने अनेक पुरस्कार प्राप्‍त केले आहेत. कोणतेही पाठबळ नसतानाही तिने स्वकर्तृत्वावर हे यश प्राप्त केले आहे. याअगोदरही तिने विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. दिल्ली येथील सामाजिक संस्था म्हणून भारतभर कार्यरत असलेल्या बहुजन ग्रामीण विकास सेवा संस्था असोसिएशनतर्फे हा पुरस्‍कार दिल्ली येथे झालेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित केल्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी तिचा गौरव केला.