Tue, June 6, 2023

अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा
Published on : 29 March 2023, 2:43 am
भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी शहरातील अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासक, तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार आता अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जात आहे.
प्रभाग समिती तीनच्या कार्यक्षेत्रात इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांना प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार फुलेनगर, खडीमशीन येथील स्मशानभूमीच्या मागे घर क्रमांक १६८२ च्या तळमजल्याचे काम अवैधरित्या पूर्ण झाले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने सोष्टे यांनी अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त दीपक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई करून शहर पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने इमारत जमीनदोस्त केली आहे.