Fri, June 2, 2023

विनयभंगप्रकरणी तरुणाला जयपूरमधून अटक
विनयभंगप्रकरणी तरुणाला जयपूरमधून अटक
Published on : 31 March 2023, 2:46 am
मुंबई, ता. ३१ ः वांद्रा पोलिसांनी शुक्रवारी वांद्रे पश्चिमेकडील क्लबमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जयपूरमधून २२ वर्षीय तरुणाला अटक केली असल्याची माहिती आज दिली. श्रेय जैन असे आरोपी तरुणाचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. या प्रकरणात पीडित ३० वर्षीय महिला मूळची बेंगळुरुची असून एका मित्राच्या लग्नासाठी ती मुंबईत आली होती. २५ मार्च रोजी वांद्रे पश्चिमेकडील पाली हिल भागातील एका क्लबमध्ये आयोजित पार्टीमध्ये ती सहभागी झाली असता आरोपीने तिचा विनयभंग केला.