Fri, June 9, 2023

सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी विलास गहला
सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी विलास गहला
Published on : 1 April 2023, 11:57 am
विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : गावातील विकास हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असतो; परंतु ग्रामसेवक व सरपंच यांच्यात समन्वय नसल्याने या गावातील विकास व शासनाच्या योजना या योग्य पद्धतीने राबवल्या जात नाहीत. यादृष्टीने विक्रमगड तालुक्यामध्ये तालुक्यातील सरपंच यांची कमिटी करण्यात आली. या कमिटीचे तालुका अध्यक्ष म्हणून डोल्लहारी बुद्रुकचे सरपंच विलास गहला यांची एक मताने निवड करण्यात आली; तर केवचे विलास घाटाल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच लहू नडगे, मंजू कोंब, संजय वैजल, नीलम गावित, पूनम म्हसकर, गणेश कुऱ्हाडा, सदानंद लाखन यांची इतर पदांवर निवड करण्यात आली. पंचायत समिती विक्रमगड येथे उपसभापतींच्या दालनात ही सभा पार पडली.