Tue, June 6, 2023

कल्याण- विठ्ठलवाडी स्मशानभूमीची दुरवस्था
कल्याण- विठ्ठलवाडी स्मशानभूमीची दुरवस्था
Published on : 2 April 2023, 10:50 am
कल्याण, ता. २ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील विठ्ठलवाडी स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी पालिकेने निविदा काढत ठेकेदारांची नेमणूक केली असताना सहा महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून १५ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोज नायर यांनी पालिकेला इशारा दिला आहे. कल्याण पूर्वमधील ३० वर्षांपूर्वी विठ्ठलवाडी स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे. तेथील बांधकामे धोकादायक झाली असून अंत्यसंस्कार केल्यानंतर स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.