माणगावात इफ्तार पार्टी उत्साहात

माणगावात इफ्तार पार्टी उत्साहात

माणगाव, ता. ९ (बातमीदार) : पवित्र रमजान महिन्यात माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम ॲड. राजीव साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी (ता. ८) केले. त्यासाठी लोकनेते माजी आमदार अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान, द. ग. तटकरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने द. ग. तटकरे महाविद्यालयात भव्य प्रांगणात इफ्तार पार्टी घेण्यात आली. या वेळी माणगाव नगरपंचायत हद्दीतील; तसेच तालुक्यातील मोर्बा, टेमपाले, दहिवली, लोणशी, साई, निजामपूर आदी गावांतील मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, संजयआण्णा साबळे, युवा नेते वैभव साबळे, द. ग. तटकरे महाविद्यालय कमिटीचे सदस्य नरेंद्र गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष नितीन दसवते, नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती तथा नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक राजेश मेहता व अजित तारळेकर, नगरसेविका शर्मिला सुर्वे, नितीन बामगुडे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. विनोद घायाळ, शहरप्रमुख सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते सिराज परदेशी, उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com