दोशी महाविद्यालयाच्‍या मुलींची चमकदार कामगिरी

दोशी महाविद्यालयाच्‍या मुलींची चमकदार कामगिरी

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः राष्ट्रीय सेवा योजना आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने १८ आणि १९ एप्रिलला मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ संकुलात राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्‍ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून युवा संसदेसाठी निवड झालेल्या चार स्वयंसेविकांमध्ये श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयाच्या दोन स्वंयसेविकांची निवड झाली आहे. साक्षी साठे आणि ज्योती सिंग अशी या मुलींची नावे आहेत.
यामध्‍ये देशातील लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्याकरिता व सुशिक्षित अभ्यासू होतकरू तरुण-तरुणींचा राजकारणात येण्याचा कल वाढवण्याकरीता युवा संसदेचे आयोजन करण्यात येते. राज्‍यस्‍तरीय या संसदेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून एकूण ७८ बहुआयामी, अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेल्या स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या वेळी साक्षी साठे आणि ज्योती सिंग या अनुक्रमे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पेयजल मंत्री या पदांसाठी निवडणूक लढवत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळ, डायरेक्टर, प्राचार्या डॉ. आशा मेनन, उपप्राचार्य, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय अधिकारी डॉ. विनोद झालटे, महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून साक्षी साठे आणि ज्योती सिंग यांचे अभिनंदन केले आहे. या राज्यस्तरीय युवा संसदेची श्रीमती नाथीबाई महिला विद्यापीठ मुंबईचे प्राध्यापक समन्वयक म्हणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी मेथे यांची निवड विद्यापीठाचे समन्वयक डॉ. नितीन प्रभूतेंडुलकर यांनी केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. डॉ. शिवाजी मेथे यांच्यावर विद्यापीठाच्या युवा संसदेत सहभागी सर्व स्वयंसेवकांची जबाबदारी देण्यात आली आहे.

काय आहे युवा संसद
देशातील लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्याकरिता व सुशिक्षित, अभ्यासू, होतकरू तरुण-तरुणींचा राजकारणात येण्याचा कल वाढवण्याकरीता राष्ट्रीय सेवा योजना आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमानाने युवा संसद आयोजित केली जाते. प्रत्‍येक राज्‍यस्‍तरावर या युवा संसदेचे आयोजन करण्यात येते.

निवडणुकीची चुरस
राज्‍यस्‍तरीय युवा संसद यंदा १८ आणि १९ एप्रिलला पार पडत आहे. राज्‍यातील जिल्ह्यांमधून एकूण ७८ बहुआयामी, अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेल्या स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या स्‍वयंसेवकांमध्‍ये निवडणूक लढवली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com