बेशिस्त वाहनचालक रडारवर

बेशिस्त वाहनचालक रडारवर

वाशी, ता. १० (बातमीदार)ः वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकांमुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. नवी मुंबई आरटीओ विभागाकडून अशा बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत तब्बल १४ हजार ७९७ बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईतून ३३८.८७ कोटींचा दंड वसूल केला आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न वापरणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह याविषयी जनजागृती केली जाते. त्यांना सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जातात. तरीही वाहनचालक वाहतूक नियमांना बगल देत वाहने चालवतात. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीचे धडे देऊनही शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी आरटीओने तब्बल १० हजार ३३८ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेट फिरणारे आहेत, तर योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या, तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या, विना सीटबेल्ट अशा त्रुटी असणाऱ्या वाहनचालकांचाही समावेश आहे.
-----------------------------------------------------------
नवी मुंबई शहरातही वाहन अपघात वाढत आहेत. त्या अनुषंगाने अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात १४ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून नियम मोडणाऱ्या १०,३३८ वाहनांचा समावेश आहे.
- हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com