धामोळेतील पाणी समस्या सुटली

धामोळेतील पाणी समस्या सुटली

खारघर, ता. १० (बातमीदार) : सिडकोच्या गोल्फ कोर्सच्या मैदानावर पाण्याचा सर्रास अपव्यय होत आहे; मात्र दहा मीटर अंतरावर असलेल्या धामोळा पाड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याबाबत समाजमाध्यमांवर वाच्यता झाल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागालाही सेंट्रल पार्कमधून पाड्यापर्यंत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घ्यावे लागले असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान वातावरण आहे.
धामोळे पाड्यात पालिकेकडून दिवसाआड टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. वाढत्या उन्हामुळे ग्रामस्थांना तहान भागवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिडकोच्या सेंट्रल पार्क गाठून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते. दरम्यान, खारघरमधील एका जागृत नागरिकाने शहरात चोवीस तास पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत असल्याची व्यथा मांडली होती. तसेच एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरमधील धामोळे पाड्यातील ‘महिलांच्या नशिबी हंडा-कळशी’ असल्याचा संदेश व्हायरल केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com