पनवेलमध्ये कोरोनाचे १०१ रुग्ण

पनवेलमध्ये कोरोनाचे १०१ रुग्ण

नवीन पनवेल, ता. १० (वार्ताहर)ः वातावरणातील बदलांसोबतच सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. पनवेल महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णसंख्या १०१ वर गेल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.
इन्फ्लूएंझा एच ३ एन २ चा संसर्ग शहरात नाही. मात्र, कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सोमवार (ता.९) च्या अहवालानुसार तपासणी केलेल्या रुग्णांपैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १०१ पेक्षा अधिक झाली आहे. मात्र, त्यांच्यात सौम्य लक्षणे असल्याने बहुतांश रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. तसेच एच ३ एन २ व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कोरोना, एच ३ एन २ संसर्ग झालेल्या रुग्णांना सहा प्राथमिक आरोग्य केंद्र भरारी पथके तयार करून औषधोपचार उपलब्ध केले आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, असे आवाहन केले आहे.
-----------------------------------
विभागवार रुग्ण संख्या
कळंबोली - ११
कामोठे- १८
खारघर- ४४
नवीन पनवेल - १२
पनवेल - १५
तळोजा - १
एकूण - १०१
-----------------------------
नागरिकांनी सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत. तसेच कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये, म्हणून घरी अलगीकरणात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा.
-डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com