कचऱ्यामुळे त्वचेचे विकार

कचऱ्यामुळे त्वचेचे विकार

खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघर सेक्टर सोळा वास्तुविहार गृहनिर्माणजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रालगत खाडीकिनारा, मोकळ्या जागेवर पालिकेच्या ठेकेदारांकडून घनकचरा डम्पिंग केला जात आहे. या घनकचऱ्यामुळे हाकेच्या अंतरावर शाळा, तसेच गृहसंकुलांमधील नागरिकांनी दुर्गंधीसोबत श्वसनाचे, तसेच त्वचेचे विकार होत असल्याची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे.
खारघर शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, यासाठी एकीकडे पालिका प्रयत्न करीत असताना दुसरीकडे खारघर सेक्टर सोळा वास्तुविहार गृहनिर्माणाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रालगत मोकळ्या जागेवर पालिकेकडून घनकचरा टाकला जात आहे. ज्या ठिकाणी हा घनकचरा टाकला जात आहे. तेथून पन्नास मीटर अंतरावर केपीसी शाळा आहे. त्यामुळे या शाळेसोबतच काही अंतरावर असलेल्या वास्तुविहार गृहनिर्माण सोसायटीमध्येही रहिवाशांना श्वसन, तसेच त्वचेचे विकार वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालिकेने बेकायदा कचराभूमी स्थलांतर करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी सीमा टॅंक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
------------------------------------------
पालिकेविरोधात संतापाची लाट
सिडकोकडून खारघरमधील घनकचरा उचलून घोट येथील डम्पिंग मैदानावर कचरा टाकला जातो. मात्र हा प्रकल्प सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर पालिकेने सिडकोच्या खारघर कार्पोरेट पार्कच्या मैदानावर दोन ठिकाणी कचरा संकलन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेकडून खारघर परिसरात बेकायदा घनकचरा संकलन केले जात असेल तर खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडांवर डेब्रिज टाकणाऱ्यांचा काय गुन्हा, असा प्रश्न खारघरवासीयांकडून विचारला जात आहे.
----------------------------------------
घनकचरा साठवून ठेवण्यासाठी या ठिकाणी सिडकोने जागा राखीव ठेवली आहे. छोट्या वाहनांतून जमा होणारा घनकचरा मोठ्या वाहनांतून स्थलांतर केला जात आहे. त्यामुळे खारघरमध्ये कचरा साठवला जात नाही.
- डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com