पेट्रोल कारला चालकांची पसंती

पेट्रोल कारला चालकांची पसंती

वाशी, ता. १० (बातमीदार)ः पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर जवळपास सारखेच झाल्याने नवीन वाहन खरेदी करताना गाडीचा लुक आणि देखभाल खर्च याचा विचार करून पेट्रोल गाड्यांना नवी मुंबईकर प्राधन्य देताना दिसत आहेत. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत नवी मुंबई आरटीओ कार्यालयात ३५ हजार ८०१ वाहनांची नोंद झाली आहे. त्यापैकी १६ हजार ७८२ दुचाकींबरोबर पेट्रोलवर चालणाऱ्या ४ हजार ५११ चारचाकींची नोंद अधिक झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आणि सीएनजी पंपाच्या कमतरतेमुळे विजेवरील गाड्या घेण्याकडे नवी मुंबईकरांचा कल कमी आहे. त्यामुळे ३४८ इलेक्ट्रिक मोटार कारची नोंद ही आरटीओ कार्यालयात आहे; तर डिझेलवर चालणाऱ्या फक्त २ हजार ७५ कारची नोंद आहे. पेट्रोल प्लस सीएनजीवर चालणाऱ्या २ हजार ८१० गाड्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे डिझेल व सीएनजी चालणाऱ्या गाड्यांमध्ये पेट्रोल कार घेण्याकडे नवी मुंबईकरांचा कल अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
------------------------------------------
हौसेला मोल नाही
नवीन वाहन खरेदी करताना सर्वांगीण विचार नवी मुंबईकर करताना दिसतात. इंधनाचे दर दिवसागणिक वाढत असले तरी हौसेला मोल नाही, याची प्रचिती वाहन खरेदीवरून दिसत आहे. खासगी कार घेताना सर्वाधिक कार पेट्रोलच्या विकल्या जात आहेत. देखभालीचा खर्च बघता डिझेल आणि सीएनजी कारपेक्षा पेट्रोलची कार परवडत असल्याचे बोलले जाते. मर्सिडीज, बीएमडब्लू, ऑडी, पजेरो, जग्वार अशा कोटीच्या उड्डाणे असलेल्या महागड्या गाड्याही खरेदी केल्याची नोंद आरटीओमध्ये आहे.
-----------------------------------
पेट्रोल कारचा देखभाल खर्च कमी असतो. मुंबई, नवी मुंबईमध्ये वाहनांची संख्या माणसागणिक वाढत असून सीएनजी पंप आणि चार्जिंग स्टेशनची कमतरता प्रामुख्याने जाणवते. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी पेट्रोल कार उपयुक्त ठरते.
- राकेश मोकाशी, कारचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com