निराधार ज्येष्ठांना महापालिकेचा आधार

निराधार ज्येष्ठांना महापालिकेचा आधार

वाशी, ता. १० (बातमीदार)ः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देशात व राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिका वृद्धाश्रम तयार करणारे पहिले शहर ठरले आहे. कारण सीवूड्स येथील वृद्धाश्रमाचे काम अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत ही सुविधा नवी मुंबईतील वृद्धांसाठी सुरू होईल, असे संकेत नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
धावपळीच्या जीवनात वृद्धांची शुश्रूषा करणाऱ्यांचे प्रमाण चांगले असून ज्येष्ठांबाबत आदर व आपुलकीने सेवा करणाऱ्यांबरोबरच दुसरीकडे कुटुंबातील ज्येष्ठांना गैरसोयीमुळे, तसेच कौटुंबिक अडचणींमुळे वृद्धाश्रमात ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विभक्त कुटुंब पद्धती व बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रमाची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे निर्माण केली आहेत. आपल्या जीवनाच्या सरत्या काळात आनंदाची, आपलेपणाची, आपुलकीची व प्रेम देणारी केंद्रे अशी ओळख या पालिकेच्या विरंगुळा केंद्रांची झाली असून शहरातील लाखो ज्येष्ठांना ही केंद्रे आधार वाटत आहेत. एकत्र येऊन विविध कार्यक्रम, वाचनालयाची सुविधा, करमणुकीची साधने पालिकेने या ठिकाणी दिली असताना दुसरीकडे पालिकेच्या इतिहासात प्रथमच वृद्धाश्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
--------------------------------------
कोरोनाच्या अडथळ्यामुळे विलंब
पालिकेच्या मागणीनुसार सिडकोकडून पालिकेला भूखंड हस्तांतर झाल्यानंतर पालिकेकडून वृद्धाश्रमाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पालिकेचा पहिला वृद्धाश्रम २०२२ पर्यंत आकारास येणार होता; परंतु कोरोनाच्या अडथळ्यामुळे कामाला विलंब झाला. आता याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे.
---------------------
शहरातील पालिकेचे पहिले वृद्धाश्रम सीवूड्स येथे तयार करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई शहराबरोबरच पनवेल आणि राज्य व देशभरात खासगी संस्थांचे वृद्धाश्रम असून नवी मुंबईत महापालिकेचे निर्माण होणारे वृद्धाश्रम हे देशभरातील व राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पहिले वृद्धाश्रम बांधण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई पालिका
-------------------------------------------
ठिकाण- नेरूळ सेक्टर- ३८, भूखंड क्रमांक- १३
प्रस्तावित खर्च- ४ कोटी १० लाख, ५९ हजार
एकूण बांधकाम - ९,७६३ चौरस फूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com