डाळी, कडधान्यांची शतकी वाटचाल

डाळी, कडधान्यांची शतकी वाटचाल

वाशी, ता. १० (बातमीदार) ः उन्हाच्या तीव्रतेबरोबर सर्वसामान्यांना महागाईच्या झळांचाही सामना करावा लागत आहे. कारण अवकाळी पावसाने धान्याच्या दरांवर परिणाम झाला आहे. गहू, ज्वारी, बाजरीबरोबरच डाळी व कडधान्यांच्या दरांनी शतकी वाटचाल केल्याने गृहिणींचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २३ ते २६ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी बाजरी २७ ते ४२ रुपये व ज्वारी २२ ते २९ रुपये प्रतिकिलोवरून २८ ते ५० रुपयांवर गेली आहे. गव्हाच्या किमती प्रतिकिलो २३ ते ३२ वरून २८ ते ५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचा गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी, तर उडीद, मूगडाळ, तूरडाळींनी होलसेल मार्केटमध्येच शंभरी ओलांडली आहे.
----------------------------
अवकाळी पावसामुळे धान्य, कडधान्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. मे पर्यंत कडधान्यांचे बाजारभाव पुन्हा स्थिर होण्याची शक्यता आहे.

- भीमजी भानुशाली, व्यापारी
-------------------------------------------------------
घाऊक बाजारातील दर
२०२२ २०२३
बाजारी २३ ते २६ २७ ते ४२
गहू २३ ते २६ २८ ते ३८
गहू लोकवन २४ ते ३० २७ ते ३६
गहू सीवर २९ ते ३२ ३० ते ५०
ज्वारी २२ ते २९ २८ ते ५०
हरभरा ५२ ते ५७ ५० ते ६०
मसूर ७२ ते ७५ ६६ ते ७५
मसूर डाळ ७२ ते ८२ ७१ ते ७८
उडीद ५५ ते ६० ८० ते १०६
उडीद डाळ ८० ते १०० ८५ ते ११५
मूग ८५ ते १०० ८२ ते ११०
मूगडाळ ८७ ते १०५ ८० ते ११०
तूरडाळ ८५ ते १०५ ७५ ते ११५
शेंगदाणे ८० ते १०५ ९० ते १२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com