सायबर चोरट्यांकडून सहा लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर चोरट्यांकडून सहा लाखांचा गंडा
सायबर चोरट्यांकडून सहा लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांकडून सहा लाखांचा गंडा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर): कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका तरुणाला सायबर टोळीतील महिलेने ऑनलाईन रिव्ह्यूज तसेच इंटरनॅशनल कंपनीचा प्रचार केल्यास मोबदला देण्याच्या बहाण्यातून ६ लाख १३ हजार रुपये उकळून फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
घणसोलीत राहण्यास असून तो एका कॉर्पोरेट कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. ३१ मार्च रोजी तरुण आपल्या घरामध्ये असताना आरुशी नावाच्या महिलेने त्याच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला होता. त्यात आरुशीने त्यांची कंपनी ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर रिव्ह्यूज देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच त्याने लोकल बिझनेस आणि इंटरनॅशनल कंपनीचा प्रचार केल्यास कंपनी त्याबदल्यात प्रत्येक रिव्ह्यूसाठी १५० रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच टेलिग्रामवरून १५० रुपये पाठवून त्याचा विश्वास संपादन केला. त्यामुळे या तरुणाने तीन दिवसांमध्ये ६ लाख १३ हजार रुपये भरले; मात्र त्यांच्याकडून काहीच परतावा न मिळाल्याने या तरुणाने त्यांच्याकडे पैसे परत मागितल्यानंतर व्हीआयपी कस्टमर झाल्याचे सांगण्यात आले.