डहाणू शहर विकास आराखड्यास हरकती

डहाणू शहर विकास आराखड्यास हरकती

कासा, ता. १० (बातमीदार) : डहाणू शहराचा विकास आराखडा १३ मार्च रोजी मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यास प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने भौगोलिक पर्यावरणीय बदलांमुळे कालबाह्य झाल्याने सर्वार्थाने विकास होण्यासाठी पुनर्पाहणी करून नव्याने आखणी होण्याकरता सकारण व परिस्थितीचे अवलोकन होण्यासाठी काही मुद्द्यांवर सोसायटी फार फास्ट जस्टीसने हरकत दाखल केली आहे.
डहाणू शहर विकास आराखडा तयार होऊन अंदाजे ३० वर्षे झाली आहेत. शहरातील वाढ लक्षात घेऊन नवीन आराखड्याची गरज आहे. शहराची लोकसंख्या, वाहन संख्या वाढली आहे. डहाणू शहराच्या किनारपट्टीलगत समुद्राच्या वाढत्या भरतीचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. डहाणूजवळील कंत्राटी नदीवरील धरणे दुरुस्तीची गरज आहे. शहरातील नदीची नैसर्गिक रुंदी माती भरावामुळे कमी झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात शिरत आहे. शहरातील अवैध बांधकामांवर लवादाच्या आदेशाने कारवाई केल्याने जुन्या विकास आराखड्यात बदल करावा, असे सांगण्यात आले आहे.


--------------
डहाणू शहराचा विकास आराखडा ३० वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. आता मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, वाहन संख्या याचा परिणाम जाणवत आहे. शहरातून निघणारे सांडपाणी, कचरा व्यवस्थापन यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आराखड्यात बदल करावा यासाठी आम्ही हरकती घेतल्या आहेत.
- प्रकाश अभ्यंकर, सचिव सोसायटी फार फास्ट जस्टीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com