हॉटेलच्या आड दारूचा अड्डा

हॉटेलच्या आड दारूचा अड्डा

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : शहरातील शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबला कंपाऊंडमधील एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू विक्री सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिस उपायुक्तांना याविरोधात लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील कल्याण रोड येथील बाबला कंपाऊंड परिसरात मोठ्या संख्येने यंत्रमाग कारखाने आहेत. त्यामधील कामगार आणि अन्य लोक या हॉटेलमध्ये जाऊन दारूचे सेवन करतात. या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली गावठी दारू, देशी दारू विक्री केली जात असून अनेक लोक त्याच ठिकाणी मद्यप्राशन करतात. त्या नशेत काही वेळा वाद होऊन आपसांत मारामारीदेखील करतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. या हॉटेल मालकाकडे देशी दारू विक्रीचा परवाना नाही. अवैधरीत्या हा व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील स्थानिक नागरिक आणि पॉवरलूम व्यावसायिकांकडून या अवैध व्यवसायाला विरोध होत आहे.

बाबला कंपाऊंड आणि नाईक कंपाऊंड परिसरात सहा वेळा अवैध व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. दोन वेळा कारवाई केलेल्या व्यावसायिकांचे प्रकरण स्थानिक सहायक पोलिस आयुक्तांकडे दाखल केले आहे. तसेच कारवाई करताना मिळालेल्या मालाचा पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आली. कोणी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असेल, तर त्यांच्यावर करण्यात येईल.
- महादेव कवाडे, दुय्यम निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com