आदिवासी मल्हार कोळी महासंमेलन उत्साहात

आदिवासी मल्हार कोळी महासंमेलन उत्साहात

कासा, ता. १० (बातमीदार) : आदिवासी मल्हार कोळी जमातीचे पाचवे महासंमेलन शांतीरतन विद्यामंदिर कोंडगाव, करसोड येथे पार पडले. मेळाव्याची सुरुवात पारंपरिक आडवे तुर वाद्य आणि धुमसा वाद्य वाजवून करण्यात आली. या वेळी गाव वेशीवर पूजा करून आदिवासी दैवत हिरवा, हिमाय, झोटिंग, वाघ देव आणि कनसरी माता यांची भगत आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. धरती आबा बिरसा मुंडा, राणी झलकारी देवी, जननायक तंट्या भिल आदी आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
आदिवासी संमेलनाला आदिवासी एकता परिषद संस्थापक अध्यक्ष काळूराम काका धोधडे, माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार विलास तरे, दत्तात्रेय तरसे, अशोक भोईर, ग्रामस्थ यांच्यासह डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड, जव्हार, वाडा, भिवंडी, वसई, मुंबई आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने मल्हार कोळी समाज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडग सर आणि सुभाष भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मोहन गुहे यांनी केले. प्रा. सुधीर भोईर यांनी आभार मानले.

------------------
आदिवासींचा इतिसाह, हक्कांवर मार्गदर्शन
आदिवासी मल्हार कोळी महासंमेलनाला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मल्हार कोळी जमातीचा इतिहास, या जमातीत होणारी घुसखोरी, बोगस आदिवासी, जमातीची सद्यस्थिती आणि पुढील आव्हाने, आदिवासीचे अधिकार, वनजमीन हक्क कायदा, पारंपरिक वाद्य यांचे महत्त्व, आपली भाषा, वाद्य, संस्कृती, लोकगीते, नाच यांचे संरक्षण आणि संवर्धन, जंगल वाचवा इत्यादी अनेक विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित सर्व बांधवांनी आडवे तूर आणि धुमसा यावर नाचण्याचा आनंद घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com