ख्रिश्चन समाजाची मुंबईत निषेध रॅली

ख्रिश्चन समाजाची मुंबईत निषेध रॅली

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती, कर्मचारी, चर्च आणि संस्थांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत या घटनांविरोधात आवाज उठवण्याकरिता १२ एप्रिल रोजी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायाच्यावतीने बुधवारी (ता. १२) दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईतील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत निषेध रॅली काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाज एकवटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते जितू राठोड यांनी दिली. या रॅलीच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धर्मादाय संस्थांद्वारे सामाजिक काम केल्याचे निदर्शनास आणून दिले जाणार आहे. ख्रिश्चन समुदायाविरोधात राबवल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण मोहिमा थांबवण्यात याव्यात, राजकीय नेत्यांची ख्रिश्चन समुदायाविरोधातील द्वेषपूर्ण भाषणे थांबवली जावीत, धर्मांतरविरोधी कायदा राबवला जाऊ नये, मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये, तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चन दफनभूमी असावी, ठाण्यात दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आलेले प्लॉट देण्यात यावेत, ४० आयोगांमध्ये ख्रिश्चन समुदायाला प्रतिनिधित्व मिळावे, आदी मागण्या रॅलीत करण्यात येणार असल्याचे जितू राठोड यांनी सांगितले. या वेळी डॉल्फन डिसूझा, संजय लोंढे, फादर पॉल जोसेफ, जोसेफ डायस, डॉ. रॉबिन राऊत, रुपस कल्काते, सुनील मेटकरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com