बांद्रा नव्हे वांद्रे हवे!

बांद्रा नव्हे वांद्रे हवे!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : भारतीय रेल्वेवर त्रिभाषेनुसार कामकाज चालवण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना असताना पश्चिम रेल्वेकडून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. नुकतेच संवर्धन पूर्ण झालेल्या ऐतिहासिक वांद्रे स्थानकाचे नाव बांद्रा स्टेशन असे झळकवण्यात आले आहे. यामुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली असून याबाबत तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेने ऐतिहासिक वांद्रे स्थानकाच्या संवर्धनाचे काम नुकतेच पूर्ण केले. यामुळे स्थानकाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. सायंकाळी दिव्यांच्या उजेडात स्थानक इमारत आणखी लख्ख चकाकते. स्थानक संवर्धनासाठी तब्बल ११ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र या खर्चानंतरदेखील स्थानकाचे नाव मराठीत झळकवलेले नाही. त्यामुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली असून याबाबत थेट केंद्रीय प्रशासनिक सुधार आणि जन तक्रार विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.
...
राजभाषेचा प्रथम वापर हवा!
तक्रारदार हेमंत आठले यांनी आपल्या तक्रारी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा राजभाषा ही मराठी आहे. भारत सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राजभाषेचा प्रथम वापर करणे हे सर्व शासकीय संस्थांना बंधनकारक आहे. असे असूनही लोहमार्ग स्थानकाच्या नामफलकार मराठीचा वापर नाही. इतकेच नाही तर इंग्रजी भाषेत स्थानकाचे नाव Vandre ऐवजी Bandra असे करण्यात आले आहे. हा प्रकार नियमबाह्य आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर मराठी द्वेष केल्याप्रकरणी कारवाई करावी, तसेच नियमानुसार नामफलक राष्ट्रभाषा मराठीत करण्यात यावा, परकीय भाषेतील फलकावर वांद्रे / Vandre असा उल्लेख करावा, असेही हेमंत आठले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com