खारघर झाले चकाचक

खारघर झाले चकाचक

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : खारघरमधील सेंट्रल पार्क परिसरातील भव्य मैदानावर राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यानिमित्ताने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून कित्येक दिवसांपासून खारघरमधील खडबडीत रस्ते आता चकाचक झाले आहेत. रस्त्याच्या दुभाजकांवर वाढलेल्या झाडी-झुडपांची छाटणी केली आहे. रस्त्याच्या दुभाजकांच्या कठड्यांना पुन्हा रंग चढवण्यात आल्यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे.
गेली अनेक वर्षे समर्थ बैठकीच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करून संताची परंपरा चालवणारे आप्पासाहेबांचा सरकारतर्फे यथोचित सन्मान सोहळा खारघरच्या भूमीवर होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयायी खारघरमध्ये येणार आहेत. या अनुयायींना येण्यासाठी चांगले रस्ते, पिण्यासाठी पाणी, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी डोक्यावर छत, आजूबाजूचा स्वच्छ परिसर आदी सुविधा पुरवण्यासाठी सिडको आणि पनवेल महापालिकेचे विविध विभागांतर्फे वेगाने कामकाज सुरू झाले आहे. उत्सव चौकापासून सेंट्रल पार्क दरम्यानच्या रस्त्यांवर बसणारे सर्व फेरीवाल्यांच्या गाड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. खड्डे आणि खोदकामामुळे खडबडीत झालेले रस्त्यांना चकाचक करण्यात आले आहेत. रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या छाटून टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. दुभाजकांना पुन्हा रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच कचऱ्याच्या कुंड्या हटवण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला असणारा कचरा, भंगार वाहने आणि अडगळीच्या वस्तू बाजूला काढून परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि नीटनेटका करण्यात आला आहे.

सेंट्रल पार्क परिसराचा कायापालट
विशेष म्हणजे सेंट्रल पार्कच्या मैदानावर सुमारे १०० पेक्षा जास्त कामगार कामाला लावण्यात आले आहेत. मैदानातील खाचखळगे बुजवण्यासाठी माती टाकून सपाटीकरण केले जात आहेत. एरव्ही ओसाड दिसणारा हा परिसर आता स्वच्छतेच्या कामामुळे पूर्ण रूपडेच पालटून गेले आहे.

ेकेंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती?
या कार्यक्रमाला देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाचा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आढावा घेत आहेत. त्यासाठी स्थानिक प्राधिकरणाचे धाबे दणाणले असून सर्व प्रशासन कामाला लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com