महाराष्ट्र भूषण सोहळ्याची इतिहासात नोंद होईल!

महाराष्ट्र भूषण सोहळ्याची इतिहासात नोंद होईल!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १० : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देऊन ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराची उंची वाढणार आहे. त्यामुळे या सोहळ्याची इतिहासात नोंद होईल, असा हा भव्य सोहळा होईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला देशभरातून तब्बल २० लाख श्री सदस्य सहभागी होतील, असा अंदाजही शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

राज्य सरकारतर्फे १६ एप्रिल रोजी खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी सिडको व पनवेल महापालिकेतर्फे खारघरमध्ये सुशोभीकरणासह अन्य तयारीला वेग आला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमस्थळाला भेट दिली. या भेटीदरम्यान मैदान, रस्ते, श्री सदस्यांची बैठक व्यवस्था, मंच आदी नियोजनाची शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

याप्रसंगी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात कोणत्याही प्रकाराचा अडथळा होऊ नये म्हणून कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महापालिका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सोहळ्यासाठी चोख व्यवस्था
- ३३२ एकर जमीन, एक हजार फिरती शौचालये
- ३० ते ४० हजार वाहनांसाठी भव्य वाहनतळ
- विविध राज्यांतून येणाऱ्या श्री सदस्यांसाठी रंगनिहाय बैठक व्यवस्था
- एनएमएमटी आणि बेस्टच्या ५०० आणि टीएमटीच्या २०० बस
- अग्निशमन विभागाचे १० बंब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com