चित्रपटसृष्टीचा पश्चिम रेल्वेशी ‘ताल से ताल मिला...’

चित्रपटसृष्टीचा पश्चिम रेल्वेशी ‘ताल से ताल मिला...’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १०: पश्चिम रेल्वेची रेल्वे स्थानके नेहमीच चित्रपट निर्मात्यांना प्रिय असतात. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवर विविध ठिकाणी २० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून त्यामधून १.६४ कोटींचे उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले आहे. एका अर्थाने हा चित्रपटसृष्टीचा पश्चिम रेल्वेशी ‘ताल से ताल मिला...’चा अनुभव आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेवर विविध ठिकाणी २० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यामधून १.६४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पश्चिम रेल्वेने ६७ लाख रुपये कमावले; तर २०१९-२० मध्ये ते एक कोटी आणि २०१८-१९ मध्ये ते १.३१ कोटी कमावले होते. गेल्या काही वर्षांत पश्चिम रेल्वे परिसरात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले आहे. यामध्ये लंच बॉक्स, हिरोपंती २, गब्बर इज बॅक, एअरलिफ्ट, पॅडमॅन, रा. वन, फँटम, एक व्हिलन रिटर्न्स, ये जवानी ही दिवानी, राधे, लक्ष्मी बॉम्ब यांचा समावेश आहे. काई पोचे, आत्मा, घायाळ रिटर्न, कमिने, हिरोपंती, हॉलीडे, थुपाकी (तमिळ चित्रपट), डी-डे, शेरशाह, बेल बॉटम, ओमाय गॉड २ यासह गुजराती चित्रपट कच्छ एक्स्प्रेस आणि लोचा लपसी, मराठी चित्रपट आपडी थापडी यांचाही यात समावेश आहे; तर एक्स-रे, अभय २, ब्रेथ इन द शॅडोज, डोंगरी ते दुबई इत्यादी वेबसीरीज आणि केबीसी प्रोमोदेखील पश्चिम रेल्वेच्या लोकेशन्सवर शूट करण्यात आले.
...
आर्थिक वर्ष- प्राप्त महसूल
२०१८ -१९-१.३१ कोटी
२०१९- २०-१ कोटी
२०२१-२२-६७ लाख
२०२२- २३-१.६४ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com