कोटींची उड्डाणे, अनेकांची गृहस्वप्नपूर्ती!

कोटींची उड्डाणे, अनेकांची गृहस्वप्नपूर्ती!

वाशी, ता. १० (बातमीदार) : क्रेडाई-बीएएनएमच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकासमोरील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे चार दिवसीय २१ वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनातून अनेक नागरिकांनी पाहिलेले घरांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या प्रापर्टी एक्झिबिशनमध्ये २० लाख ते १५ कोटी रुपयांपर्यंत अत्याधुनिक लक्झरी घरे उपलब्ध होती, असे क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष वसंत बद्रा यांनी स्पष्ट केले.

गेल्या २० वर्षांत लाखो कुटुंबांचे आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनातून पूर्ण केले आहे. यंदाही २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनात एकाच छताखाली नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते. या भव्य प्रदर्शनाचे ‘डेल्टा ग्रुप’ मुख्य संयोजक; तर पॅराडाईज ग्रुप आणि डीडीएसआर ग्रुप हे मुख्य प्रायोजक, सह-प्रायोजक सुरिंदर सभालोक प्रो. कामधेनू रिअ‍ॅलिटीज, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड आणि टेस्कॉन ग्रीन हे नामांकित ग्रुप होते.

प्रापर्टी एक्झिबिशनमध्ये सुमारे १५० बांधकाम व्यावसायिकांनी सहभागी घेतला होता. नवी मुंबई, सिडकोच्या नैना प्रकल्पात तयार झालेल्या त्याचप्रमाणे निर्माणाधीन, भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रकल्पातील घरे बांधकाम व्यावसायिकांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती.

कनेक्टिंग नवी मुंबई
मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनात कनेक्टिंग नवी मुंबई आणि विमानतळाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. खारघर, नेरूळ, खोपोली, कर्जत, रोहिंजग, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पाम बीच, एनआरआय, सानपाडा आदी ठिकाणी महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प असलेले शेकडो बिल्डर्स या प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभागी झाले होते.

प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामधून कोटींची उलाढाल झाली. २१ व्या प्रदर्शनातील गृह सवलतींचा लाभ घेत नागरिकांनी नवी मुंबई विमानतळाच्या कुशीत विसावलेल्या नगरीत आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
- वसंत बद्रा, अध्यक्ष, क्रेडाई-बीएएनएम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com