दर्शन सोळंकीला मित्राने धमकावले?

दर्शन सोळंकीला मित्राने धमकावले?

मुंबई, ता. १० : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अरमान खत्री या विद्यार्थ्याला रविवारी अटक केली. त्याच्या चौकशीत अरमानने रागात दर्शनला कटर दाखवत धमकावल्याची माहिती समोर येत आहे; परंतु अरमानसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल नकार दिला आहे. दुसरीकडे दर्शनच्या आत्महत्येस फक्त अरमान जबाबदार नसल्याचे मत दर्शनच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.
दर्शनने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या रागातून अरमानने त्याला कटर दाखवून धमकावले. त्यामुळे दर्शन घाबरला होता. त्याने खत्रीची माफीही मागितली होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अरमानने धमकावण्यासाठी वापरलेल्या कटरचा शोध घेणार असून काही व्यक्तींचे जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चाकूबाबतचा दावा पूर्णत: खरा नसल्याचे मित्रांनी तपासात सांगितले आहे.
...
दर्शन-अरमान मैत्री
एसआयटी पथकाने अरमानसोबत शिकणाऱ्या काही सोबत्‍यांचीदेखील चौकशी केली. त्यांच्या मते अरमान आणि दर्शन हे चांगले मित्र बनले होते. परीक्षेतील कमी गुणांमुळे दर्शन डिप्रेशनमधून जात असल्याचे अरमानला माहिती होते, अशी माहिती तपासात मिळत आहे.
...
एकमेव कारण नाही!
९, १० आणि ११ फेब्रुवारीला तीन दिवस दर्शनने अरमानशी वाद केल्याचा एसआयटी पथकाचा दावा आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला दर्शनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे एकमेव कारण असू शकत नाही, असे मत दर्शनच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com