Lata Mangeshkar Award: आशा भोसलेंना लता मंगेशकर पुरस्कार ! मोदींनंतर पुरस्कार मिळणाऱ्या ठरल्या दुसऱ्या व्यक्ती

Lata Mangeshkar Award: आशा भोसलेंना लता मंगेशकर पुरस्कार ! मोदींनंतर पुरस्कार मिळणाऱ्या ठरल्या दुसऱ्या व्यक्ती

विद्या बालन , प्रसाद ओक यांनाही विशेष पुरस्कार जाहीर

मुंबई, ता. १८ : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. उषा मंगेशकर यांनी आज याबाबत घोषणा केली. मागील वर्षी २४ एप्रिलला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता.

पुरस्कार प्रदान सोहळा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी सोमवारी २४ एप्रिलला माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. यासोबतच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार भारतीय संगीत क्षेत्रासाठी पंकज उधास यांना, वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या गौरी थिएटर्सला आणि समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सद्‍गुरू सेवा संघ ट्रस्ट यांना जाहीर करण्यात आला आहे.

साहित्य क्षेत्रात समर्पित सेवेसाठी ग्रंथाली प्रकाशनला विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवेसाठी प्रसाद ओक यांना विशेष पुरस्कार आणि चित्रपट क्षेत्रातील सेवेसाठी विद्या बालन यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com