सीडबॉल

सीडबॉल

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : आधुनिकतेच्या युगात मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि ढासळलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. अशातच जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा कोरतड येथील विद्यार्थ्यांनी आपली दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीडबॉल बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात परिचित नसलेल्या या सीडबॉलचे महत्त्व मोठे आहे.
पर्यावरणाचे संवर्धन आणि जाणीव-जागृती मूल्य रुजवण्यासाठी कोरतड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या सहभागातून आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला हा उपक्रम हाती घेतला आहे. माती, सेंद्रिय खत अर्थात शेणखण व विविध प्रकारच्या बियाण्यांचे एकत्रित मिश्रण करून त्यांचे छोटे-छोटे गोळे बनवून उन्हात सकवण्यात आले आहेत. खरीप हंगामाचा पाऊस सुरू होईपर्यंत हे बॉल सुरक्षित ठेवले जातात.
या उपक्रमाला कोरतड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता सहारे, सहशिक्षक प्रदीप चौधरी व बंडावार यांनी सहकार्य केले आहे. ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातून हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला कोरतड शाळा व्यवस्थापन समितीचेसुद्धा मोलाचे सहकार्य लाभत आहे.

-------------------
जून महिन्यात वन विभागाकडे सुपूर्द
योग्य प्रकारे पाऊस झाल्यानंतर हे गोळे म्हणजेच सीडबॉल ज्या ठिकाणी पेरणी अथवा रोपांची लागवड करायची आहे अशा ठिकाणी ठेवून ही रोपे लागवड करण्याची एक सोपी पद्धत म्हणून या सीडबॉलकडे पाहिले जाते. शिवाय ओसाड माळरानातही हे सीडबॉल पावसाळ्यात फेकले जातात. मातीमिश्रित असल्याने पावसाळ्यात सहज सीडबॉलमधील बी उगवते. या सीडबॉलमुळे रोपांच्या लागवडीसाठी खोदण्यात येणारे खड्डे खोदण्याची गरज नसते. या अनोख्या सीडबॉलचे फलित म्हणून विद्यार्थी एक हजार सीडबॉलची निर्मिती करून ते वन विभागाकडे पेरणीसाठी जून महिन्यात देण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com