राजेवाडी शाळेला आयएसओ मानांकन

राजेवाडी शाळेला आयएसओ मानांकन

मोखाडा, ता. २२ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावर्डे जिल्हा परिषद शाळेपाठोपाठ राजेवाडी शाळेने आयएसओ मानांकन मिळवले आहे. आयएसओ मानांकनाचे सर्व निकष पूर्ण केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते राजेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पांडुरंग विशे यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. या वेळी अनिल येवले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राजेवाडी शाळेने आयएसओचे निकष अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण केले आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक, महिला मंडळ, वारकारी मंडळ राजेवाडी व शिक्षक यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याबद्दल अनिल येवले यांनी सर्वांचे अभिनंदन केले व मुलांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे असल्याचे मत व्यक्त करून शाळेला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या कुसुम झोले, सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ, पंचायत समिती सदस्या आशा झुगरे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले, गटविकास अधिकारी कुलदीप जाधव, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी रामचंद्र महाले, सखाराम रेरे, अनिल कडू, नंदकुमार वाघ, मोखाडा तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भरत गारे, राजेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण पाटील, पोलिस पाटील विमल जागले, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

-----------------------------
सर्व शाळा आयएसओ करणार
पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मुख्याध्यापक रवींद्र विशे यांचे कौतुक करून राजेवाडी शाळेला एक इमारत मंजूर केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच मोखाडा तालुक्यातील १०० टक्के शाळा आयएसओ करण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. या वेळी मोखाडा तालुक्याचे सभापती थेतले यांनीही शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी राजेवाडी शाळेसाठी मेहनत घेतली व मुख्याध्यापक रवींद्र विशे यांनी सुट्टीच्या काळातदेखील मुलांना अधिक वेळ देत गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना मोफत साहित्य मिळवून दिल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com