लोकमान्य सोसायटी वसई शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य सोसायटी वसई शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात
लोकमान्य सोसायटी वसई शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात

लोकमान्य सोसायटी वसई शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

वसई, ता. २० (बातमीदार) : लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्या वसई शाखेने १०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठले आहे. यानिमित्त भव्य स्नेहसंमेलन व ग्राहक मेळाव्याचे आयोजन लोकमान्य सोसायटीतर्फे पार पडले. या समारंभास वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी, वसई चर्चचे धर्मगुरू आर्च बिशप फेलिक्स अँटनी मचाडो, डॉ. विजय शिरीषकर, लोकमान्य सोसायटीच्या संचालिका गायत्री काकतकर, बेळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. दीक्षित यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व लोकमान्य सोसायटीच्या विविध प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती देऊन चांगल्या ग्राहकसेवेची ग्वाही दिली. वसई शाखेने १०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठल्याबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमास लोकमान्यचे अतुल परब, नागेश नलावडे, देवरथ कारंडे, सत्यव्रत नाईक, सागर तायडे, सतीश सोनार यांच्यासह वसई शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. लोकमान्य सोसायटीचे मुंबई क्षेत्रीय व्यवस्थापक रमेश शिरसाट यांनी आभार मानले. या वेळी सुगम मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे, केतकी भावे-जोशी, आनंदी जोशी यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

----------------------
मान्यवरांकडून शुभेच्छा
माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी लोकमान्य सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच वसई शहर ज्या वेगाने विकसित होत आहे त्याबद्दल वसईच्या जनतेचे कौतुक केले. डॉ. विजय शिरीषकर यांनी संस्थेच्या संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या ग्राहक सेवेबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. वसई चर्चचे धर्मगुरू आर्च बिशप फेलिक्स अँटनी मचाडो यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करून लोकमान्य सोसायटीला उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.