डॉक्टरच्या अपहरणप्रकरणी तिघांना अटक

डॉक्टरच्या अपहरणप्रकरणी तिघांना अटक

मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : शहरातील डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्याकडून ३० लाख रुपये खंडणी वसूल केल्याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. याप्रकरणी तपास सुरू असून आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

२१ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्री रोगतज्ज्ञ डॉ. जितेंद्र बेंडारी हे स्कूटरवरून घरी जात होते. रस्त्यात एका व्यक्तीने त्यांना नावाने हाक मारत लिफ्ट मागितली. त्यानंतर म्हसा रस्त्यावर त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. त्यांना तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी खंडणीसाठी फिरवत ठेवले आणि मारहाण केली होती. अखेर तीस लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते; मात्र गुंडांना घाबरून मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. याबाबत तब्बल २७ दिवसांनी तक्रार दाखल करण्यात आली होती.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सोनोने, सचिन उदमले, दीपक गायकवाड यांनी परिश्रम घेतले. जगदीश काशिनाथ बोटकुंडले (वय ३३), रूपेश शिवाजी बोटकुंडले (वय ३३) आणि दिनेश भगवान केम्बारी (वय ३४, सर्व रा. देवगाव) यांना अटक करण्यात आल्याचे मुरबाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com