सराफा दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक

सराफा दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : लोकांचे दागिने घेऊन दोन सराफा दुकानदारांनी पळ काढल्याची घटना उलवे येथे समोर आली आहे. दुकानदारांनी लोकांकडून तब्बल १६ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेतली होती. विकास आणि महावीर जैन अशी या दोघांची नावे आहेत. एनआरआय पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास व महावीर जैन यांचे उलवे येथे स्वर्ण शिल्पी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान होते. त्या भागात राहणाऱ्या फातिमा मोमीन यांनी एका लग्नसमारंभासाठी डिसेंबर २०२२ मध्ये या दुकानातून १ लाख ६० हजार किमतीचे अलंकारिक दागिने बनवून घेतले होते. काही दिवसांनंतर या दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारण्याच्या बहाण्याने जैन यांनी दागिने परत मागितले. त्यामुळे मोमीन यांनी फेब्रुवारी माहिन्यात त्यांना हे दागिने दिले, पण मोमीन आपले दागिने परत आणण्यासाठी गेल्या असता त्यांना दुकान कायमचे बंद झाल्याचे आढळून आले.

त्याच वेळी आणखी काही ग्राहक आपले दागिने परत आणण्यासाठी आले होते. या सर्वांनी दुकान उघडण्याची महिनाभर वाट पाहिली, पण दुकानदाराचा काहीही संपर्क होऊ न शकल्याने सर्वांनी मिळून पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. फसवणूक झालेल्यांपैकी फातिमा मोमीन यांचे १ लाख ६० हजार, तुषार पवार ९ लाख ८५ हजार, साक्षी सिंग २ लाख ७५ हजार आणि शहाना राजगुरू ५० हजार यांचे दागिने सराफा दुकानदाराने लांबवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com