पनवेलमध्ये नागरी आरोग्य केंद्र

पनवेलमध्ये नागरी आरोग्य केंद्र

पनवेल, ता. २२ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र आणि चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २१) करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनानंतर सगळ्या जगाची आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. लोकांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून महापालिका चांगल्या आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने रोहिंजण, पालेखुर्द, भिंगारी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खारघर सेक्टर १२, कोयनावेळे, पडघे, टेंभोडे येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन या वेळी झाले. या वेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे सहायक संचालक डॉ. चाकुरकर, उपायुक्त सचिन पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी सुविधा देण्यासाठी ६ सोनोग्राफी सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आले. याचबरोबर रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांना मोफत रक्त व रक्तघटक देण्याच्या दृष्टीने २ रक्तपेढींसोबत सामंजस्य करार करण्यात आले. संशयित क्षयरुग्णांच्या मोफत डिजिटल एक्स-रे चाचण्या करण्यासाठी ५ एक्स-रे सेंटरसोबत सामंजस्य करार, पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटरच्या ऑनलाईन नोंदणीकरिता नवीन संकेतस्थळाचे प्रक्षेपण, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे मशीनद्वारे निदान करणाऱ्या सेवा पुरवठाधारकांशी सामजंस्य करार मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले. या वेळी पालिका हद्दीतील पॅथॉलॉजी सेंटरच्या ऑनलाईन नोंदणीच्या संकेतस्थळाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
---
या वर्षीच्या महापालिकेच्या बजेटमधील मोठा भाग आरोग्य सेवेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवण्याची गरज होती. महापालिका या वर्षात ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारणार आहे. यातील तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे लोकार्पण आज करत आहोत.
- गणेश देशमुख, आयुक्त
---
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तीन नवीन नागरी आरोग्य केंद्रे, चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे वेगवेगेळया सेवांसह लोकांच्या सेवेमध्ये दाखल होत आहेत. या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा लोकांना अधिकाधिक निरोगी राखण्यासाठी व जलद उपचार मिळण्यासाठी उपयुक्त ठरतील. येथे सकाळी ९ पासून संध्याकाळी ५ पर्यंत डॉक्टर उपलब्ध असतील. म्हणून या सगळ्या सेवेबद्दल मी महापालिकेचे अभिनंदन करतो.
- प्रशांत ठाकूर, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com