सूर्यफूल शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

सूर्यफूल शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

संदीप साळवे, जव्हार

पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक शासकीय योजना, सामाजिक संस्थांच्या विविध प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी प्रगती साधू लागला. याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे येथील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सूर्यफूल लागवड करून आधुनिक शेतीतून आर्थिक हित जोपासत पर्यावरणाचेदेखील रक्षण करण्याचे काम केले आहे. यामध्ये जव्हार, विक्रमगड, पालघर व डहाणू तालुक्यातील शेतकरी हा प्रयोग साधत आहेत. याकरिता बायफकडून मोलाचे मार्गदर्शन लाभून शेतकऱ्यांना तीन महिन्यांत प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
आदिवासी शेतकऱ्यांचे शाश्वत जीवनमान उंचावण्यासाठी बायफ विविध पद्धतीने काम करते व कार्यक्रम राबवते. याच कार्यक्रमांचा एक उपक्रम म्हणून २०० हून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी सात गुंठेकरिता ५०० ग्रॅम बियाणे देऊन नियोजित मार्गदर्शन केले. यामध्ये सूर्यफूल, मोहरी, करडई, तीळ यांसारख्या तेलबियांचे उत्पादन मुख्य तसेच मिश्रपीक पद्धतीने घेण्यास सुरुवात केली आहे. भातकापणीनंतर शेतातील ओलाव्यावर पिके घेण्यास मोठा वाव असतो. परिसंस्थेच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोहरी, करडई आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबियांचे उत्पादन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर पेरणी किंवा टोकण पद्धतीने, भाजीपाला पिकांमध्ये आंतरपीक घेण्यात येत आहे. बायफचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली; तर विनोद बोरसे, किरण भागडे, पंकज परदेशी, संतोष आगळे, नितीन भोये बायफ जव्हार टीम यांच्यामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी झाली.


-----------------------------
एकात्मिक कीड व्यवस्थापन
तेलबियांकडे मुख्यतः मावा कीड आकर्षित होते. मावा कीड ही या पिकांना चिकटून राहते. या किडीचा नाश करणारी लेडी बर्ड बिटल (ढाल कीडा), क्रायसोपा, सिरफीड माशी, कुंभार माशी यांसारखी नैसर्गिक जैविक नियंत्रण करणारी किटके आकर्षित होतात. हिवाळी ऋतूमध्ये मावा कीटक प्रामुख्याने सूर्यफूल, करडई, खुरसानी यांसारख्या तेलबिया पिकांकडे आकर्षित होतात आणि खिळून राहतात. तेलबिया पिकांच्या फुलापासून पराग गंध आणि परागकण स्रोत प्रदान करून शेतात एकात्मिक कीड व्यवस्थापनास गती येते. कीटकांची विविधता वाढवण्यास मदत होते. या उपक्रमातून नैसर्गिक अन्न साखळी मजबूत होण्यास मदत मिळते. नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन, परिसंस्थेबद्दल शेतकऱ्यांची जागरूकता असणे व त्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे आजच्या काळात आवश्यक आहे.


----------------------
सूर्यफूल शेती करणे अगदी नवीन होते; परंतु उत्पन्न आणि पर्यावरण समतोल यांचा मेळ राखता येऊन आर्थिक परिस्थिती पाहता ही शेती अगदी फलदायी आहे.
- काला दिघे, मेंढ्याचा पाडा, जामसर

------------------
सूर्यफूल शेतीद्वारे शाश्वत उत्पन्न मिळायला लागले आहे. या नवीन शेतीप्रणालीचा वापर करून युवा वर्गाने यातून प्रगती साधली पाहिजे.
- खंडू भोगाडे, भोवरदाचा पाडा कौलाळे, जव्हार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com