चोरीच्या उद्देशाने वृद्धेची हत्या

चोरीच्या उद्देशाने वृद्धेची हत्या

अंधेरी, ता. २३ (बातमीदार) : चोरीच्या उद्देशाने मारीसिलीन डिकोस्टा या ६९ वर्षीय वयोवृद्ध महिलेची मोलकरणीने दोन सहकाऱ्‍यांच्या मदतीने हत्या केल्याची घटना मालाड परिसरात गुरुवारी (ता. २०) रात्री घडली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच महिलेसह तिघांना मालाड पोलिसांनी आज अटक केली. शबनम शेख, मोहम्मद उमेर शेख आणि शहजाद शेख अशी या तिघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध चोरीसाठी कट रचून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र आडाणे यांनी सांगितले. मालाड येथील न्यू लाईफ सहकारी सोसायटीमध्ये ही घटना घडली. मारीसिलीन डिकोस्टा या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर एकट्याच राहत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com