
बोर्डीत शनिवारी खगोलशास्त्र महोत्सव
बोर्डी, ता. २४ (बातमीदार) : बोर्डी अॅस्ट्रॉनॉमी क्लबने बोर्डी मराठी शाळा येथे शनिवारी (ता. २९) आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिनानिमित्त खगोलशास्त्र महोत्सव आयोजित केला आहे. अंधश्रद्धा दूर करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात खगोलशास्त्रीय मॉडेल्स, गेम्स, चंद्र आणि ग्रहांचे दुर्बिणीद्वारे निरीक्षण, खगोलशास्त्रावरील थेट चर्चा आणि खगोलशास्त्राविषयी बरेच काही अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. शालेय शालेय विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी आहे. खगोलशास्त्र आणि विज्ञानात रुची असलेल्यांनाही या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. या महोत्सवाचे आयोजन बोर्डी अॅस्ट्रोनॉमी क्लब आणि त्याचे सदस्य अथर्व पाटील, सूर्यहास चौधरी, अजय पाटील आदींनी केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्यांमध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करणे आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे, अशी माहिती आयोजक अथर्व पाटील यांनी दिली आहे.