Murder
Murdersakal

Ambarnath Crime : छातीत चाकू खुपसून मुलाने केली वडिलांची हत्या

मुलाने वडिलांची चाकूच्या सहाय्याने हत्त्या केल्याची घटना अंबरनाथच्या बुवा पाडा परिसरात घडली.
Summary

मुलाने वडिलांची चाकूच्या सहाय्याने हत्त्या केल्याची घटना अंबरनाथच्या बुवा पाडा परिसरात घडली.

अंबरनाथ - मुलाने वडिलांची चाकूच्या सहाय्याने हत्त्या केल्याची घटना अंबरनाथच्या बुवा पाडा परिसरात घडली. याप्रकरणी प्रकाश वर्मा (१९) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश याचे वडील राजेश वर्मा त्याच्या आईला दारू पिऊन मारहाण करत असत. रविवार रात्री राजेश यांनी प्रकाशच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तेव्हा प्रकाशने वडीलांना याबाबत समजावून सांगितले, तरीही त्यांनी आईला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या प्रकाश याने छातीत चाकू खुपसून वडील राजेश यांची हत्या केली. याप्रकरणी प्रकाश शर्मा याला अटक करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com