
मुंबई विमानतळावर समर शॉपिंग कार्निव्हल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : विमान प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७० दिवसांचा ‘समर शॉपिंग कार्निव्हल’ आयोजित केला आहे. हा समर कार्निव्हल २ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. उन्हाळी सुट्टीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७० दिवसांचा समर शॉपिंग कार्निव्हल आयोजित केला आहे. या समर कार्निव्हलमध्ये विमानतळावरील १०० पेक्षा जास्त किरकोळ वस्तूमध्ये प्रवाशांना सूट मिळणार आहे. यंदाचा समर कार्निव्हल ‘बीट द हीट विथ कूल ऑफर्स’ या थीमवर आधारित आहे. येथे प्रवाशांना खाद्यपदार्थापासून ते कपड्यांपर्यंत खरेदी करता येणरा आहे. तसेच यावर सूटदेखील मिळणार आहे. प्रवाशांना या समर शॉपिंग कार्निव्हलची माहिती मिळावी, यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाने अॅक्टिव्हिटी झोनजवळ विशेष क्यूआर कोड ठेवला आहे. हा कोड स्कॅन करताच प्रवाशांना कार्निव्हल संदर्भात सगळी माहिती मिळेल. त्यानंतर त्यांना विमानतळावर शॉपिंग करणे सहज शक्य होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.