CM Eknath Shinde in vasai
CM Eknath Shinde in vasaisakal

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वसईत

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच वसईमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत

विरार : वसईतील तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (ता. २७) वसईत येत आहेत. दरम्यान आश्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी आश्रम व्यवस्थापन समितीकडून जोरदार तयारी सुरू आहे.

या कार्यक्रमाला तुंगारेश्वर पर्वत येथे सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच वसईमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. भर दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता तुंगारेश्वर येथे येणार आहेत. हा बदल महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com