ठाणे जिल्ह्यासाठी १० हजार ५२० मे. टन खतांचा साठा मंजूर

ठाणे जिल्ह्यासाठी १० हजार ५२० मे. टन खतांचा साठा मंजूर

खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून नियोजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरू झाली असून त्यासाठी लागणारी रासायनिक खते, बी-बियाणे व कीटकनाशके शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी ११ हजार ३९० मे. टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यासाठी १० हजार ५२० मे. टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. तसेच सध्याच्या घडीला दोन हजार मे. टन खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात भात पिकाखालील सरासरी क्षेत्र ५५ हजार हेक्टर एवढे असून खरिपाखालील क्षेत्र ६५ हजार हेक्टर एवढे आहे. जिल्ह्यासाठी भात बियाण्यांची २२ हजार क्विंटल एवढी गरज असून ५५ टक्के बियाणे बदल अपेक्षित धरून शासनाकडे १२ हजार १०० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधारित व संकरित वाणांचा समावेश आहे. भात बियाण्यांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व विविध खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत होतो. त्याचप्रमाणे ११ हजार ३९० मे. टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली असून जिल्ह्यासाठी १० हजार ५२० मे. टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. तसेच सध्याच्या घडीला दोन हजार मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. खतांची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे २० ते २५ हजार लिटर विविध कीटकनाशके व बुरशीनाशकांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, विविध यंत्रणा समन्वयाने काम करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

.............................
सहा भरारी पथके
रासायनिक खते, बी-बियाणे व कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी यांना आळा घालण्यासाठी व कृषी केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com