बँकेच्या संगणकप्रणालीच्या बिघाडाचा ग्राहकांना फटका

बँकेच्या संगणकप्रणालीच्या बिघाडाचा ग्राहकांना फटका

कळवा, ता. २९ (बातमीदार) : कळवा नाका येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गेल्या काही दिवसांपासून संगणक प्रणाली बिघडामुळे बँक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून त्याचा फटका त्यांच्या आर्थिक व्यवहारांना बसला आहे. कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील पाच ते सहा लाख लोकसंख्येसाठी कळवा नाका येथे राष्ट्रीयीकृत बँकेची ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ची एकमेव शाखा असून या बँकेत ग्राहक एकच गर्दी करतात, परंतु बँकेतील संगणक प्रणालीच्या बिघाडामुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते आहे. तसेच एकच कॅश काऊंटर असल्याने अनेक ग्राहकांना व ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने त्याचा फटका त्यांना सोसावा लागत आहे. या कळवा शाखेत कर्मचारी भरती व संगणक प्रणाली त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. दरम्यान, शाखेच्या व्यवस्थापक पायल सिंग यांनी सांगितले, की ‘संगणक प्रणाली बिघाडामुळे व नेटवर्क स्लो सुरू असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, परंतु ही सेवा लवकरच सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com