शहरातील सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करा : संजय हेरवाडे

शहरातील सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करा : संजय हेरवाडे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : पावसाळ्यात शहरातील सखल भागांत पाणी साचते, त्या ठिकाणच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पुरेशा सक्षमतेच्या पंपांची व मनुष्यबळाची व्यवस्था करणे, मलवाहिन्यांच्या नादुरुस्त चेंबर्सची तातडीने दुरुस्ती करून घेणे, ड्रेनेज वाहनांची चोवीस तास व्यवस्था करणे, तसेच रस्त्यांची साफसफाई, फूटपाथ साफसफाई, शहरातील राडारोडा, कचरा उचलणे आदी सर्व कामे ३१ मे पूर्वी करण्याच्या सूचना आज झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त- २ संजय हेरवाडे यांनी संबंधित सर्व विभागांना आज दिल्या.
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थ‍िती उद्भवू नये, यासाठी तसेच मान्सूनपूर्व कामे करून घेण्याबाबत व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यासाठी महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी दरड कोसळणारी संभाव्य ठिकाणे, पाणी साचणारे सखल भाग तसेच धोकादायक इमारतींची माहिती घेऊन त्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मान्सून कालावधीत आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत राहील, या दृष्टिकोनातून कामाचे नियोजन करणे, साथीच्या रोगांवर उपाययोजना व पावसाळी आजारांवर पुरेसा औषध साठा उपलब्ध करणे, पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ तयार ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला या वेळी अतिरिक्त आयुक्त- २ संजय हेरवाडे यांनी दिले. शहरातील सर्व जलकुंभ, पंप व पंपहाऊस, मुख्य जलसंतुलन टाकी, जलशुद्धीकरण केंद्र, अशुद्ध केंद्र, अशुद्ध पाण्याचे पिसे येथील पम्पिंग स्टेशन येथील पाहणी करणे, आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेचे सर्व टँकर व खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तयार ठेवणे, तसेच सर्व प्रभाग समितीतील चेंबर्सची दुरुस्ती करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. तसेच आपल्कालीन परिस्थिती उद्‍भवल्यास आपद्ग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी शाळा उपलब्ध करून द्याव्यात, शाळेची प्रसाधनगृहे स्वच्छ व अद्ययावत ठेवण्याबाबत शिक्षण विभागाला सूचित करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थतीत बोटींची व्यवस्था करणे, दैनंदिन पावसाची नोंद घेणारी यंत्रे अद्ययावत करणे, धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यकतेप्रमाणे फांद्या छाटण्याचे काम हाती घेण्यात यावे आदी सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने शोध बचावाकरिता साधनसामुग्रीचे नियोजन करणे, सर्व भ्रमणध्वनी व दूरध्वनी कार्यरत ठेवणे, आपत्ती व्यवस्थापन आराखडा करणे, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल सुसज्ज ठेवण्याचे आदेश या बैठकीत संबंधितांना देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com